ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री हरिहरेश्वर सेवा मंडळाचा ३० ऑक्टोबरला मुंबईत स्नेह मेळावा..!

श्री हरिहरेश्वर सेवा मंडळाचा ३० ऑक्टोबरला मुंबईत स्नेह मेळावा..!

प्रकाशन: 28 Oct 2022 01:11 PM
वाचन संख्या 103

मसुरे | प्रतिनिधी :
श्री हरिहरेश्वर सेवा मंडळ तळवडे मुंबई यांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२२ रोजी माटुंगा- मुंबई येथे वाडीतील ग्रामस्थांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि कार्यक्रमाला शुभारंभ होईल.
अक्कलकोट भूषण तथा श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक विश्वस्त श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. सकाळी ९.१० वाजता कार्यक्रमाची प्रस्तावना व मान्यवरांचे स्वागत, सकाळी १० वाजता गणेश वंदना (सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात) सकाळी ११ वाजता प्रमुख पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा, सकाळी ११.२० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा, दुपारी १२ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात,दुपारी १ वाजता स्नेह भोजन, उपस्थित कुटुंबीयांचा सत्कार सोहळा,दुपारी २ वाजता मनोरंजनात्मक खेळ, दुपारी ३.३० वाजता चहा व कार्यक्रमाचा समारोप
सदर कार्यक्रम लक्ष्मी नारायण बाग हॉल, ब्रह्मदेव सोसायटी, बाल गोविंद दास रोड,कासारवाडी, माटुंगा (प) येथे होणार आहे. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष अशोक तुकाराम कडू, सरचिटणीस प्रकाश जगन्नाथ लब्दे,खजिनदार निलेश रामचंद्र लब्दे, सचिव नितीन म्हापसेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स