मुंबईस्थित आपल्या माणसाचे सामाजिक आवाहन..(विशेष)
श्रावण |गणेश चव्हाण : सोशल मिडीयाच्या माध्यमातून फक्त नात्यांचे व माणुसकीचे प्रदर्शन करणाऱ्या, मिडीयाच्या चार पाऊलांनी पुढे जाणारे सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील बापार्डेवासीय, सामाजात एकमेव आदर्श उदाहरण ठरले आहेत. बापार्डे गावच्या रहिवाशांचं मुंबईमध्ये दरवर्षी स्नेहसंमेलन भरले जाते. हे स्नेहसंमेलन फक्त मौजमजा आणि भेटीगाठी साठी नसून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक, आरोग्यदायी उपक्रम हाती घेतात. स्नेहाच्या या गोड कार्यक्रमांतून, गावांमधील गोरगरिबांच्या मुलांसाठी सुरू केलेलं हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज चालवण्यासाठी निधी जमा करुन, शाळेसाठी वापरला जातो. बापार्डेवासियांची अभिमानास्पद बाब म्हणजे, गेली १० वर्षे विनाअनुदानीत आठवी ते दहावी पर्यंतचे हायस्कुल स्वखर्चाने चालवतात. यावर्षीही अशाच उपक्रमाचे, बापार्डे जुवेश्वर ग्रामविकास मंडळाच्या वतीने, २९ ऑक्टों. २०२२ रोजी दामोदर हॉल, परेल मुंबई येथे, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातुन येणारी रक्कम काॅलेजच्यां बांधकामासाठी वापरणार आहेत. या आगळ्या वेगळ्या व समाजाने आदर्श घ्यावा अशा कार्यक्रमाचा बापार्डेवासियांनी व मुंबई स्थित चाकमान्यांनी अवश्य लाभ घ्यावा.
जसलोग हाॅस्पीटल मुंबईचे तज्ञ डाॅक्टर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम मर्यादित स्वरूपाचा असल्यामुळे येथे फक्त बापार्डे गावचे रहिवासी चाकरमानी यांनाच हा कार्यक्रम खुला असल्यामुळे या कार्यक्रमाला बापार्डेवासियांनी व मुंबई स्थित चाकरमान्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुधीर नाईकधुरे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)