सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नियोजन मंडळाच्या बैठकीला अखेर मुहूर्त मिळाला.
ओरोस | ब्यूरो न्यूज :
जिल्हा नियोजन समिती सभेस तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर मुहूर्त मिळाला आहे. जिल्ह्याचे नवे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा गुरुवार ३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणार आहे. या सभेमुळे मागील पाच महिने रखडून पडलेली जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. भाजपचा मंत्री पहिल्यांदाच अध्यक्ष म्हणून या सभेस बसणार असल्यामुळे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)