ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
वेंगुर्ले "दिपावली शो टाईम २०२२" चे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते उद्घाटन…!

वेंगुर्ले "दिपावली शो टाईम २०२२" चे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते उद्घाटन…!

प्रकाशन: 25 Oct 2022 10:19 AM
वाचन संख्या 40

हाॅस्पीटल नाका कला – क्रिडा मंडळ, वेंगुर्लेचे आयोजन.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
दिवाळी निमीत्त हाॅस्पीटल नाका कला-क्रिडा मंडळ, वेंगुर्लेच्या वतीने २४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत “दिपावली शो टाईम २०२२” चे आयोजन हाॅस्पीटल नाका येथे करण्यात आले असून या शो टाईम च उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी नगरसेवक विधाता सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व रंगमंचाचे उद्घाटन व्यापारी संघाचे अशोक ठोंबरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गवस, उपाध्यक्ष ॲड. मनिष सातार्डेकर, मनीषा कोल्ड्रींकचे दिनेश तानावडे, प्रशांत मेडिकलचे प्रशांत नेरुरकर, सुरेंद्र चव्हाण, शाम कौलगेकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व भुषण सारंग, माजी नगरसेवक मनिष परब व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मंडळाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना, भविष्यात ह्या मंडळाने फक्त सांस्कृतिक कार्यक्रम न घेता सामाजिक उपक्रम आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच वेंगुर्ले तालुक्यातील एक आदर्श मंडळ म्हणून नावलौकिक मिळावा असे कार्य मंडळाच्या हातुन घडावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर असे समाजाभिमुख उपक्रम या मंडळाने आयोजित करावे व त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करेन असे अभिवचन दिले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गवस व मंडळाचे पदाधिकारी यांनी मान्यवरांचे स्मृतीचिन्ह व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी राहुल वेंगुर्लेकर, आनंद कळेकर, महेंद्र गावडे, रामचंद्र सावंत, जयंत सावंत, मनीष कळेकर, प्रफुल्ल सावंत, सिद्धेश मांजरेकर, रुपेश सावंत, सचिन मांजरेकर, सौरभ भोसले, ॠतीक गवस, कौस्तुभ मयेकर, परमानंद नार्वेकर, अँड. प्रकाश बोवलेकर, प्रशांत गावडे, करण निरावडेकर, आसीफ खान, निखिल शिरोडकर, तेजस कुडाळकर, खुशाल निरवडेकर, मुकुल सातार्डेकर, शशांक मडकईकर, मकरंद होळकर, सुभाष सोनुर्लेकर, तेजस धुरी, अद्वैत बोवलेकर, कौस्तुभ गवस, जितेंद्र धुमक इत्यादी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोवेकर यांनी केले. चार दिवस चालणार्या या शो टाईम मध्ये दांडीया नृत्य, जिल्हास्तरीय रेकाॅर्ड डान्स स्पर्धा, सत्यनारायणाची पूजा व नाटक तसेच महिलांसाठी होम मिनीस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स