ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
घरगुती गणेश सजावट स्पर्धेत मसुरेच्या ईशा भोगले विजेत्या.

घरगुती गणेश सजावट स्पर्धेत मसुरेच्या ईशा भोगले विजेत्या.

प्रकाशन: 25 Oct 2022 12:14 PM
वाचन संख्या 71

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :

मुंबई सकाळ आणि परिवर्तन,चला बदल घडवुया संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेत मालवण तालुक्यातील मसुरे – भोगलेवाडी येथील ईशा भोगले या विजेत्या ठरल्या.त्यांच्या वतीने सौ. लीना गणेश भोगले(आरोसकर) यांनी पारितोषिक स्वीकारले .
सौ. लीना भोगले(आरोसकर) या मूळच्या मालवण तालुक्यातील मसुरे – भोगलेवाडी येथील रहिवाशी असून सध्या त्यांचे वास्तव्य मुंबई – घाटकोपर, पंतनगर येथे आहे. त्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कमेचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ राजू वाघमारे, मनीषा कायंदे, सचिन सावंत, दै. सकाळ चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक दिनकर कोकितकर आदी मान्यवर उपस्थित होते. या गणेश सजावट साठी ईशा भोगले, रितेश भोगले, भाग्येश भोगले, गणेश भोगले, महेश भोगले, लीना भोगले यांनी विशेष मेहनत घेतली होती. विजेत्या झाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स