सागर सावंत मित्रमंडळ पुरस्कृत नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…!
गोवा-उगवे येथील ओम बॉईज मंडळ प्रथम…!
बांदा | राकेश परब : बांदा येथील सागर सावंत मित्रमंडळ पुरस्कृत व आमची वाडी देऊळवाडी मित्रमंडळ आयोजित केलेल्या खुल्या नरकासुर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत बांदा शहरासह गोवा राज्यातील व ग्रामीण भागातील पंधराहून अधिक नरकासुर सहभागी झाले. सदर स्पर्धेत उगवे गोवा येथील ओम बॉईजच्या नरकासुराने प्रथम क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे सरमळे पेडणे गोवा येथील माऊली स्पोर्ट्स क्लबच्या नरकासुराने द्वितीय क्रमांक, तर काळोबा राष्ट्रोळी युवा मंडळ पराष्टे,गोवा यांच्या नरकासुराने तृतीय क्रमांक मिळविला.
एस के बॉईज बांदा, आदर्श नगर तांबुळी व राजेंद्र कासकर मित्रमंडळ पत्रादेवी गोवा यांच्या नरकासुर प्रतिमांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. स्पर्धेचे आर्टिस्ट परीक्षण रणजित बांदेकर,केदार कणबर्गी यांनी केले. येथील श्री बांदेश्वर मंदिर चौकात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, माजी सभापती प्रमोद कामत, सरपंच अक्रम खान, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, राजेश विरनोडकर, आबा धारगळकर,माजी ग्रा.प. सद-य गजानन गायतोंडे, सुधीर साटेलकर, सुनील धामापूरकर, रेश्मा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या स्पर्धेकांना रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सागर सावंत यांनी केले. सूत्रसंचालन नितीन नाईक, जय भोसले, राकेश परब यांनी केले. प्रत्येक मंडळाने आपल्या कौशल्याचा वापर करुन या प्रतिकूल आकर्षक बनवल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या स्पर्धेत नरकासुर पाहण्यासाठी बांदा गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य व पदाधिकारी सागर सावंत अक्षय मयेकर, सर्वेश मुळ्ये, गौरांक साळगावकर, गुरुनाथ साळगावकर, अजय तारी, युसूफ शेख, समीर सावंत, स्वप्नील सावंत, भाई म्हाडगूत यांनी मेहनत घेतली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)