ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
युवा उद्योजक सिद्धेश शिरसाट आणि पान बाजार मित्रमंडळ आयोजित नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

युवा उद्योजक सिद्धेश शिरसाट आणि पान बाजार मित्रमंडळ आयोजित नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 24 Oct 2022 04:27 PM
वाचन संख्या 51

भैरववाडी मित्र मंडळ प्रथम क्रमांक तर प्रभावळकर वाडा द्वितीय तर बाजारपेठ तृतीय माठेवाडा,जिजामाता चौक उत्तेजनार्थ.

कुडाळ/ प्रतिनिधी : शहरातील युवा उद्योजक सिद्धेश शिरसाट आणि पान बाजार मित्रमंडळ कुडाळ आयोजित नरकासुर स्पर्धेला कुडाळ शहरातील नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गेली दोन वर्षे कोरोना सारख्या महामारी नंतर ह्या वर्षी प्रथम कुडाळ शहरातील गुलमोहर हॉटेल समोर काल रात्री नरकासुर स्पर्धेला “अतिभव्य,उदंड,उत्स्फूर्त” नागरिकांचा प्रतिसाद लाभला कुडाळ शहरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी नरकासुर पाहण्यासाठी केली होती. डीजे सह कराओके सिंगिंग मजामस्ती सह ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात संपन्न झाली विशेष म्हणजे कुडाळ शहरातील पोलीस प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल युवा उद्योजक सिद्धेश शिरसाट यांनी आभार मानले आहेत. तसेच या पुढे चांगले आयोजन करून अशीच स्पर्धा घेत राहू आम्ही स्पर्धेचं हे पहिले वर्ष असल्याने काही आमच्या नियोजनात काय चूक झाल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असे युवा उद्योजक सिद्धेश शिरसाट व पान बाजार मित्रमंडळ यांनी सांगितले आहे.कुडाळ शहरातील नागरिकांनी आमच्या ह्या स्पेर्धेस चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल सहभागी झालेल्या सर्व मंडळाचे व कुडाळ शहरातील नागरिकांचे आभार मानले.

ह्या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभले ते म्हणजे पत्रकार कलाकार रजनीकांत कदम, मालवणचे साई पारकर, परीक्षकांनी योग्य प्रकारे परीक्षण केलं. मध्ये रसिकांच्या गर्दीने कुडाळ पंचायत समिती रोड ते गुलमोहर हॉटेल पूर्णपणे नागरिकांनी ब्लॉक केलेला पाहिला मिळाला ह्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला ते शहरातील भैरववाडी मित्र मंडळ,तर द्वितीय प्रभावळकर वाडा,तृतीय बाजारपेठ उत्तेजनार्थ माठेवाडा,जिजामाता चौक तसेच सहभागी झालेल्या अन्य मित्रमंडळ यांना रोख पारितोषिक देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे निवेदक नागेश नेमळेकर यांनी केले तसेच आपल्या लाजदर शैलीने कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच गर्दीत हुलडबाजी करणाऱ्याना थेट माईक हुन कानपिचक्या खास आपल्या शैलीत दिल्या

त्यावेळी युवा उद्योजक सिद्धेश शिरसाट व पान बाजार मित्र मंडळाचे सदस्य कार्यकर्ते त्यामध्ये माजी नगरसेवक सुनिल बांदेकर,चेतन पडते,हाशिम मुजावर,राजवीर पाटील, बगतावर मुजावर, केतन वर्दम, सिद्धेश वर्दम, जावेद मुजावर, राकेश नेमळेकर, संकेत शिंदे, सिद्धेश पिसे, संतोष पाटकर, किरण कुडाळकर, संजू कांबळी, सिद्धेश राणे, केदार भाट, शिल्पा सिद्धेश शिरसाट, मेघा शिरसाट कु.जिजा शिरसाट कुडाळ शहरातील लोकप्रतिनिधी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, कुडाळ नगरपंचायत नगरसेवक निलेश परब, नयना मांजरेकर, कु चांदणी कांबळी,अक्षता खटावकर, संजय भोगटे, प्राजक्ता शिरवलकर, ममता धुरी, पप्या तवटे, चेतन धुरी, शुभांगी काळसेकर, मंजुनाथ फडके सह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील ह्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स