ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जन शिक्षण संस्था सिंधुदुर्गच्या वतीने वैभववाडी येथे ५० प्रशिक्षित महिलांना शिलाई मशीनचे वितरण.

जन शिक्षण संस्था सिंधुदुर्गच्या वतीने वैभववाडी येथे ५० प्रशिक्षित महिलांना शिलाई मशीनचे वितरण.

प्रकाशन: 23 Oct 2022 08:44 PM
वाचन संख्या 80

वैभववाडी | नवलराज काळे : माजी केंद्रीय मंत्री ना. सुरेशजी प्रभु यांच्या प्रयत्नातुन, मानव साधन विकास संस्था अंतर्गत असलेल्या परीवर्तन केंद्राच्या माध्यमातुन जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग मार्फत वैभववाडी तालुक्यातील शासन मान्यताप्राप्त शिवणकला संस्थेत प्रशिक्षित असलेल्या ५० महिलांना आज मोफत शिलाई मशिनचे वाटप करण्यात आहे .

Article image


एडगाव येथील रामेश्वर विद्यामंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. मा. सुरेशजी प्रभु यांच्या प्रयत्नातुन जनशिक्षण सिंधुदुर्ग मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १००० महीलांना मोफत शिलाई मशिन वाटप करण्यात आल्या आहेत. सदर शिलाई मशिन खरेदी करण्यासाठी गोवा विमानतळ प्राधिकरणाने आर्थिक व्यवस्था केलेली आहे .

Article image

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी परीवर्तन केंद्र सिंधुदुर्ग चे जिल्हा समन्वयक विलासजी हडकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी किशोर दळवी, माजी जि.प. सदस्य सुधीर नकाशे, संजय रावराणे, आदी पदाधिकारी, मान्यवर तसेच महीला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स