ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हिंदळे येथील अजित दळवी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

हिंदळे येथील अजित दळवी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

प्रकाशन: 08 Sep 2021 05:58 PM
वाचन संख्या 117

प्रतिनिधी / मसुरे : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (नेफडो) पालघर जिल्हा व कोकणी मालवणी सामाजिक संस्था,विरार यांच्या वतीने
देवगड तालुक्यातील हिंदळे गावचे सुपुत्र अजित दळवी याना आदर्श शिक्षक पुरस्कार
प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा वेवूर – पालघर येथे विज्ञान पदवीधर शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य नै.पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे कोकण विभाग उपाध्यक्ष श्री. प्रकाश कदम, नै प.सं. व मानवता वि. संस्थेचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री बापू परब, पालघर जिल्हा व उपाध्यक्ष श्री सुभाष जाधव,पालघर जिल्हा सचिव श्री प्रकाश घाडीगावकर उपस्थित होते.
कोरोना काळात अविरत ऑनलाइन शिक्षण व्दारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक देणे तसेच सर फौंडेशन महाराष्ट्र अजीवन सदस्य असून ते शैक्षणिक स्पर्धा घेतात. पालघर जिल्हा समन्वयक असून विविध स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना संधी निर्माण करतात.पालघर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीत प्रशिक्षण विभाग, कोकणकला व शिक्षण विकास संस्थचे पालघर विभागीय अध्यक्ष असून सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत,
विद्यार्थ्यांना सतत विज्ञान प्रदर्शन व विज्ञान विषयक स्पर्धेत सतत सहभाग देण्याचे काम ते करतात.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धेत राज्यात पाचवा क्रमांक त्यांनी २०२०-२१ मध्ये प्राप्त केला आहे. अजित दळवी याना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स