ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ग्रामीण भागातील महिलांनी अंगी असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून उत्पन्नात वाढ करुन कुटुंब आर्थिक सक्षम करावे - माजी जि.प.सदस्या सौ. श्वेता कोरगावकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ग्रामीण भागातील महिलांनी अंगी असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून उत्पन्नात वाढ करुन कुटुंब आर्थिक सक्षम करावे - माजी जि.प.सदस्या सौ. श्वेता कोरगावकर.

प्रकाशन: 22 Oct 2022 10:42 PM
वाचन संख्या 64

बांदा | राकेश परब :
ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून उत्पन्नात वाढ करुन कुटुंब आर्थिक सक्षम करावे. म्हणून शासन विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र आले पाहीजे. आपल्या कुटुंबातील महिलांनी चुल व मुल मर्यातदित न राहता त्यांनी सरकारच्य‍ा  या अभियानाला बळ देत आपली महिल‍ांनी एकत्र येऊन आपली उन्नती साधली पाहीजे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य‍ श्वेता कोरगांवकर यांनी क‍ाढले.

Article image

आनंदी मंगल क‍ार्यालय बांद‍ा येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालूका अभियान कक्ष सावंतवाडी अंतर्गत ‘सत्यम प्रभागसंघ बांदा’यांची पहिली वाषिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. सभागृह‍ात बांदा, नेतर्डे,ताबुंळी,असनिये,पडवे माजगाव, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल आदी ७ गावातील ८४५ महिला उपस्थित होत्या.यावेळी सौ.कोरगावकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे,लुपिनचे जिल्हा समन्व्यक प्रताप चव्हाण,तांबुळी सरपंच  अभिलाष देसाई,तंटामुक्ती अध्यक्ष गुरूनाथ सावंत,रूपाली शिरसाट,अर्चना पांगम, प्रज्ञा कामत,प्रिया कामत, समुपदेशक नमिता परब,अर्पिता वाटवे,  तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष स्वाती रेकडर,तालुका व्यवस्थापक शिवानंद गवंडे तालुका व्यवस्थापक,रिदिमा पाटकर,कौशल्य समन्वयक
रश्मी भाईप,प्रभाग समन्वयक अपर्णा भंडारी, गजानन राठोड,सत्यम प्रभागसंघ अध्यक्ष उत्कर्षा कदम, कोषाध्यक्ष वैशाली पै,सचिव सुवर्णा गाड प्रभागातील सर्व सीआरपी व इतर सर्व केडर उपस्थित होते. बांदा प्रभागसंघ व्यवस्थापक शिल्पा सावंत व बांदा प्रभाग समन्वयक कुवरसिंग पाडवी यांच्या नियोजनखाली वाषिॅक सर्वसाधारण सभा पार पडली. प्र‍ास्ताविक उत्कर्षा कदम, सुत्रसंचालन सौ.  लक्ष्मी सावंत मनोगत वैशाली पै,आभार सुवर्णा गाड यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स