ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
कासार्डे विद्यालयात पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कासार्डे विद्यालयात पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न..!

प्रकाशन: 21 Oct 2022 07:18 PM
वाचन संख्या 25

कणकवली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन..!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
शहीद पोलिसांचे स्मरण व्हावे म्हणून २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कासार्डे ज्यु. काॅलेज मध्ये आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमात
कणकवली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हुंदळेकर विद्यार्थ्यांशी मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर बोलताना म्हणाले की समाजामध्ये वाईट प्रवृत्ती दिवस दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क राहिले पाहिजे.मोबाईलमुळे मोठ्याप्रमाणात गुन्हेगारी आणि फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत.म्हणून निनावी काॅल आला तर तो घेऊ नये व त्याला रिप्लायही देऊ नये, कारण त्यामुळे भविष्यात धोका होऊ शकतो. रस्त्यावरील अपघात होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी सक्तीने हेल्मेट वापरले पाहिजे असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. कोणीही विनापरवान गाडी चालवू नये यामध्येच आपली खरी सुरक्षितता आहे. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून रस्ते अपघात होऊ नये म्हणून रहदारीचे नियम अगदी काटेकोरपणे पाळावेत. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यावर खोटे अकाउंट काढू नये. खोट्या अफवांना बळी पडू नये हाही मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.याशिवाय मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. संस्थेची कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व प्राचार्य मधुकर खाड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पोलिस स्मृतिदिन कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रशालेचे पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर कुचेकर,पोलीस काॅन्स्टेबल किरण मेटे, डी.बी.देवरुखकर,व इतर प्राध्यापक
वर्ग उपस्थित होते.अहोरात्र मेहनत घेणारे पोलीस कर्मचारी आहेत म्हणून आपण समाजामध्ये सुरक्षित राहत आहोत. सण- वार, उत्सव, कुटुंब नबघता ते समाजाची अहोरात्र सेवा बजावतात असे गौरवोद्गार विद्यालयाचे पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले, ते पुढे म्हणाले की वाईट घटना घडल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा ती घडू यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. डी.बी.देवरुखकर यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स