सलून व्यवसायातून मुलीला बनवले डॉक्टर…!
श्रावण | गणेश चव्हाण :
नाभिक समाज बांधव बाळासाहेब किसन गायकवाड मु. उंब्रज ता. खेड जि. पुणे येथील या गरीब कुटुंबातील सलून कारागिराने कु. शर्वरी या आपल्या कन्येला बी.एच.एम. एस. होमिपॅथीचे उच्च शिक्षण देऊन, मुलीला डॉक्टर बनवले. कु. शर्वरीने ही गरुड भरारी घेतल्याने डाॅ. शर्वरीचे व बाळासाहेबांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बाळासाहेब गायकवाड यांचे उंब्रज गावात हरीओम मेन्स पार्लर आहे. सदर दुकानात सलून काम करून या जिद्दी बापाने अतिशय खडतर प्रवासातून आपली मुलगी शर्वरीला डाॅक्टरीटचे उच्च शिक्षण देवून नाभिक समाजात एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. कु. शर्वरी बाळासाहेब गायकवाड हिने संगमनेर येथे महाराष्ट्र होमिओपॅथीक कॉलेज मधून BHMS मधे फर्स्ट क्लास मध्ये पदवी संपादन केली आहे. शर्वरीने वडिलांच्या कष्टाचे चिज केले. बाळासाहेब गायकवाड हे महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे शहराचे माजी अध्यक्ष होते. आणि आजही खेड मधील नाभिक समाजकार्यात सक्रिय आहेत. अहोरात्र सलून काम करून आणि घराची बेताची परिस्थिती सांभाळत, शर्वरीला डॉक्टर बनवल्याने नाभिकांकडुन डाॅ. शर्वरीचे कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)