ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विद्युत केबीन दुरुस्तीची श्रावण गवळीवाडी येथील ग्रामस्थांची मागणी…!

विद्युत केबीन दुरुस्तीची श्रावण गवळीवाडी येथील ग्रामस्थांची मागणी…!

प्रकाशन: 19 Oct 2022 03:31 PM
वाचन संख्या 64

श्रावण | गणेश चव्हाण :
श्रावण गवळीवाडी येथे महावितरण विद्युत विभागाची, विद्युत वाहिनी डीपी मोडकळीस येवून, उघडी पडलेली आहे. बाजूलाच गवळीवाडी अंगणवाडी व प्राथमिक शाळा आहेत. या शाळेमध्ये जाणारी मुलांनी जर चुकून हात लावले, तर त्या मुलांना धोका पोहोचू शकतो. दुर्दैवाने जीवीत हानीही होऊ शकेल हे टाळण्यासाठी रामगड विद्युत विभागाने त्वरित ही डीपी – विद्युत बोर्ड बदलून तिथे नव्याने बंद अशी सुरक्षीत डिपी (बोर्ड) लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थां कडून होत आहे.
श्रावण गवळीवाडी रस्त्यालगतची विद्युत केबीन दुरुस्त होण्यासाठी वाट ग्रामस्थ पहात आहे. श्रावण गावातील गवळीवाडी ही जास्त लोकसंख्या असलेली वाडी असल्याने तेथे विद्युत भार वहिनी जास्त दाबाचे आहे. या जास्त दाबाच्या विद्युतभारीत वाहिनीची कंट्रोल केबीन (डीपी) गवळीवाडी मार्गालगत असून, नजीकच शाळा व हनुमान मंदिर आहे. येथे सतत ग्रामस्थ व लहान लहान शाळेतील मुलांची ये – जा असते. महावितरणने याची लवकरच दखल घेऊन ही विद्युत डिपी बदलावी, अशी मागणी होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स