ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वृक्षाच्या वेदना जाणून घेण्याची गरज- वन्यजीवमित्र स्वप्निल गोसावी.

वृक्षाच्या वेदना जाणून घेण्याची गरज- वन्यजीवमित्र स्वप्निल गोसावी.

प्रकाशन: 19 Oct 2022 02:57 PM
वाचन संख्या 233

चिंदर सडेवाडी येथे झाडांना लावलेल्या जाहिराती फलकांसह खिळे हटविले..!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगांच्या, दुकानांच्या, उत्सवांच्या व शिक्षण, क्लास, अशा अनेक प्रकारच्या जाहिराती करण्यासाठी झाडांना खिळे मारून माहितीफलक लावण्याचा प्रघात पडला आहे. असे फलक वेगवेगळ्या प्रकारचे खिळे वापरून वड, सावर, गुलमोहर, आंबा, निलगीरी अशा अनेक पर्यावरणदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या वृक्षांवर मारले जातात. वृक्ष हे जिवंत सजीव आहेत याचा विसर मानवाला पडला आहे असे प्रत्ययास येत आहे.

Article image


चिंदर सडेवाडी येथील ग्रामस्थांनी असे खिळे काढून झाडांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एक ते दोन कि.मी अंतरावरच्या झाडानवरुन तब्बल ८० ते ९० खिळे झाडांमधून काढण्यात आले. यावेळी दिलीप गोसावी, प्रतिक मुळये, किरण सावंत, मंगेश गोसावी, श्रेयस सावंत, स्वप्निल गोसावी, पराग मुळये, रोशन गोसावी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
झाडांनाही वेदना व संवेदना असतात हे समजून घेऊन कोणीही वैयक्तिक स्वार्थासाठी झाडांना खिळे ठोकू नये असे आवाहन वन्यजीवमित्र स्वप्निल गोसावी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स