ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कासार्डे परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस ; पोलिस दुरक्षेत्रही गेले पाण्याखाली.

कासार्डे परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस ; पोलिस दुरक्षेत्रही गेले पाण्याखाली.

प्रकाशन: 15 Oct 2022 10:26 AM
वाचन संख्या 108

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात कासार्डे,तळेरे, साळिस्ते परिसरातील काल सायंकाळी. ४वा.च्या सुमारास वीजांच्या प्रचंड कडकडाटासह ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस कोसळला आहे.यात साळिस्ते येथील पांडुरंग नारायण गुरव यांचा घरावर वीज पडून मृत्यू झाला.

Article image

कासार्डे परिसरात प्रचंड कडकडाटासह जोरदार ढगफुटी झाल्याने सर्व्हिस रोड,कासार्डे पोलिस दुरक्षेत्रही पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती.तर देऊलकरवाडी येथील महापुरुषांच्या मंदीर परिसरही जलमय झाला होता.

शुक्रवारी दुपारनंतर अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे काही क्षणातच ओढे,नाले तुडुंब भरून वाहत अनेक रस्ते पाण्याखाली गेले.

मुंबई गोवा महामार्गावर कासार्डे तिठ्यावरील सर्व्हिस रोड,कासार्डे पोलिस दुरक्षेत्र संपूर्ण पाण्याखाली गेले होते.
या पोलिस दुरक्षेत्राची जवळपास खिडकीपर्यत पाणीत इमारत बुडाली होती. महामार्ग ठेकदाराचे नियोजन शुन्य कामाची याठिकाणी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चांगलीच पोलखोल झाली आहे अशी वाहन चालक व सामान्य नागरीकांची प्रतिक्रिया येत आहे.

साधारणपणे शाळा सुटण्याच्यावेळीच ३० ते ४५ मिनिटांत प्रचंड पाऊस कोळसल्याने विद्यार्थी वर्गांचेही हाल झाले.
कासार्डे तांबळवाडी- तर्फेवाडीतील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते
परतीच्या पावसाचा शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स