वैभववाडीत परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; महावितरण कार्यालय होते आऊट ऑफ कव्हरेज.
वैभववाडी | नवलराज काळे : वैभववाडी तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे .मुसळधार पावसासहित कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी वादळ वारा सुद्धा झाला. या पावसामुळे काल सुमारे तीन च्या दरम्यान तालुक्यातील सर्व बत्ती गुल झाली, अकरा वाजले तरी लाईटचा पत्ता नव्हता. महावितरण कार्यालय संपर्क करण्यात प्रयत्न केला असता कार्यालयाची सर्व मोबाईल स्विच ऑफ किंवा आऊट ऑफ कव्हरेज एरिया दाखवत होते. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे देखील नुकसान होत आहे. असाच पाऊस पडत राहिला तर शेतकऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)