ताज्या बातम्या
हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा. मुणगे गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा सत्कार. श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग. मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
कै. डॉ. अरविंद खानोलकर यांच्या श्रद्धांजली सभेद्वारा 'सेवा करा, पण तिचा गाजावाजा करू नका' शिकवणुकीला उजाळा देऊया...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कै. डॉ. अरविंद खानोलकर यांच्या श्रद्धांजली सभेद्वारा 'सेवा करा, पण तिचा गाजावाजा करू नका' शिकवणुकीला उजाळा देऊया...!


कै. डॉ. अरविंद खानोलकर यांच्या श्रद्धांजली सभेद्वारा 'सेवा करा, पण तिचा गाजावाजा करू नका' शिकवणुकीला उजाळा देऊया...!

Article image

मळगाव वाचनालयातर्फे २६ ऑगस्टला उपस्थितीचे आवाहन.


मळगाव | प्रतिनिधी : कै. डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर यांचे दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. या पार्श्वभूमीवर कै. उदय खानोलकर वाचनालया तर्फे बुधवार दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता वाचनालयाच्या रमाकांत खानोलकर सभागृहात कै. डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे. 'सेवा करा, पण तिचा गाजावाजा करू नका" या त्यांच्या शिकवणुकीला उजाळा देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.


सहा दशकांपर्यंत अविरत रुग्णसेवा करणारे, निधनाच्या तीन दिवस आधीपर्यंत रुग्णांची सेवा करणारे, गरीब व गरजूंना मोफत उपचार देणारे, सेवाभावी, संवेदनशील आणि दातृत्वशील व्यक्तिमत्व अशी कै. डॉ. खानोलकर यांची ओळख होती. त्यांचे जाणे म्हणजे केवळ एका डॉक्टरचे जाणे नाही, तर माणुसकीला धर्म मानणारा एक आधारस्तंभ हरपला आहे अशी भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा, सेवाभावाचा वारसा पुढे नेण्यासाठी श्रद्धांजलीपर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती वाचनालयातर्फे देण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स