ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे नावलौकिकात भर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे नावलौकिकात भर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रकाशन: 14 Oct 2022 06:39 PM
वाचन संख्या 40

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही आनंदाची व अभिमानस्पद बाब आहे त्यामुळे राज्याच्या नाव लौकिकात भर पडत आहे असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथराव शिदे यांनी काढले ते मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते या वेळी संकुलातील पदक विजेत्या यशस्वी खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा प्रामुख्याने गौरव
करण्यात आला. यावेळी आमदार पराग अळवणी, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ मोहन राणे, लीना प्रभू, राजू रावळ मकरंद येडुरकर तसेच संकुलाचे पदाधिकाऱ्यांसह, प्रशिक्षक, क्रीडापटू उपस्थित होते.

प्रारंभी डॉ. रमेश प्रभू यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, डॉ. रमेश प्रभू हे लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच या क्रीडा संकुलाची उभारणी केली. या क्रीडा संकुलामधून अनेक होतकरू खेळाडू निर्माण झाले. ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा व राज्याचा नावलौकिक वाढविला. क्रीडा संकुलातून असे महान खेळाडू तयार होत आहेत. या खेळाडूंना या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य लाभले आहे. लीना प्रभू यांनी विमानतळ मेट्रो स्थानकास मुंबईचे माजी महापौर/माजी आमदार डॉ रमेश यशवंत प्रभू यांचे नाव देण्याची तसेच एखादा मुख्य रस्ता किंवा वैद्यकीय महाविद्यालय, उड्डाण पूल, मेट्रो स्थानकास डॉ पुषा रमेश प्रभू यांचे नाव देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले डॉ रमेश प्रभू यांचे मेट्रो स्थानकास नाव देण्याबाबत नक्की विचार करू तसेच या परिसरातील पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असेल असे ही मत शिंदे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. हा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले येथे नुकताच पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलाच्या कर्मचारी वर्गाने फार मेहनत घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स