ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
रोटरी क्लब कणकवली आणि विवेकानंद नेत्रालयाच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया.

रोटरी क्लब कणकवली आणि विवेकानंद नेत्रालयाच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया.

प्रकाशन: 14 Oct 2022 06:16 PM
वाचन संख्या 44

कणकवली I प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल व नॅब नेत्र रूग्णालय मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सनराईज टॅावरमधील विवेकानंद नेत्रालयामघ्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १६ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

दिनांक २६ सप्टेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलने डॉ. विद्याधर तायशेटये यांच्या ५० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून संजीवनी हॅास्पीटलमध्ये विवेकानंद नेत्रालयातील नामवंत नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये तपासणी केल्यानंतर सनराईज टॅावरमधील विवेकानंद नेत्रालयामघ्ये २९ सप्टेंबर रोजी मिरज येथील नामवंत नेत्र तज्ज्ञ डॉ. करण अनिल मगदूम यांनी १६ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली.

यावेळी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रो. दिपक बेलवलकर, प्रेसिडेंट रो. वर्षा बांदेकर, सेक्रेटरी रो. उमा परब, रो. नितीन बांदेकर, रो. डॉ विद्याधर तायशेटे, रो. महेंद्र मुरकर इत्यादी रोटेरीयन उपस्थित होते. तर नॅब नेत्र रूग्णालय मिरज संचलित विवेकानंद नेत्रालयचे संस्थापक राहुल देशपांडे, मिरज येथील नामवंत नेत्र तज्ज्ञ डॉ. करण अनिल मगदूम, व्यवस्थापक पूनम जगदाळे, रमेश जगदाळे, प्राची चव्हाण, प्राजक्ता ठाकूर, अर्चना दळवी आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स