ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा दिव्यांग विकास आघाडी, सिंधुदुर्गच्या वतीने "पांढरी काठी दिनानिमीत्त" 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत विविध उपक्रम-अनिल शिंगाडे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा दिव्यांग विकास आघाडी, सिंधुदुर्गच्या वतीने "पांढरी काठी दिनानिमीत्त" 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत विविध उपक्रम-अनिल शिंगाडे.

प्रकाशन: 14 Oct 2022 09:45 AM
वाचन संख्या 54

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :

भाजपा दिंव्याग विकास आघाडी, सिंधुदुर्ग च्या वतीने १५ ऑक्टोबर – जागतिक पांढरी काठी दिनानिमीत्त कसाल बाजारपेठ मधील सिद्धिविनायक हाॅल मध्ये दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून, जिल्हा भरातील अंधांना पांढरी काठीचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या दिंव्यागांसाठीच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
दिंव्याग संपर्क अभियान जागतिक पांढरी काठी दिनानिमीत्त भाजपा दिंव्याग विकास आघाडीच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर ते १५ नव्हेंबर या कालावधीत जिल्हा भरातील दिव्यांगांशी संपर्क केला जाणार आहे. तसेच जे दिव्यांग स्वतःचा उद्योग करण्यास इच्छुक असतील त्यांना केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच दिव्यांगांना स्वतःचा पायावर उभे राहण्यासाठी भाजपा दिंव्याग विकास आघाडी च्या वतीने प्रयत्न केले जाणार आहे.
योगायोगाने दिनांक १५ ऑक्टोबर रोजीच भाजपाचे युवा नेते विशालजी परब यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस दिव्यांगांसोबत केक कापून साजरा करण्यात येणार आहे.
भाजपा दिंव्याग विकास आघाडी ची जिल्हा पदाधिकारी बैठकीत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, जिल्हा का.का.सदस्य सचिन भाई तेंडुलकर, कुडाळ चे राजेश पडते तसेच दिंव्याग आघाडीचे सरचिटणीस शामसुंदर लोट, सदानंद पावले, प्रकाश वाघ, सुनील तांबे, संगीता संजय पवार, स्वाती निलेश राऊळ इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स