पटसंख्या कमी असलेल्या हजार मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर.
मुंबई | ब्यूरो न्यूज : राज्यातील पटसंख्या कमी असलेल्या १४,००० मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
केसरकर यांनी असा कुठला निर्णयच घेण्यात आला नसल्याचा दावा केला. केसरकर म्हणाले, पटसंख्या कमी असलेल्या १४,००० मराठी शाळा बंद करण्याचा काँग्रेसने केलेला आरोप बिनबुडाचा असून सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
वित्त विभागाकडून शाळांमध्ये पटसंख्या किती, शिक्षक किती अशी माहिती मागविण्यात येते. याचा अर्थ असा नाही की शाळाच बंद करण्यात येतील. एखाद्या शाळेत एकच मुलगा असेल तर त्या मुलालाच शिकवायचे का? त्याला शिकताना इतर मुलांची सोबत असलीच पाहिजे. अशा त्याला वेगळ्या शाळेत बसविण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. त्यासाठी कितीही खर्च आला तरी सरकारकडून केला जाईल, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)