बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ज्येष्ठांसाठी जागतिक स्मृतिभंश दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.
समाज विकास अधिकारी श्रीमती तृप्ती पवार यांचे विशेष आयोजन.
देवगड शिरगांवचे मुंबई स्थीत अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री.अनिल तावडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.
मालवण | सुयोग पंडित : बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे एफ/साऊथ वार्ड, परळतर्फे महापालिकेच्या सभागृहात जागतिक स्मृतिभंश दिनानिमित्त समाज विकास अधिकारी श्रीमती तृप्ती पवार यांनी महानगरपालिके तर्फे ज्येष्ठांसाठी विशेष कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला होता.
समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक ती उपयुक्त माहिती देण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघानी उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्या तक्रारी समस्या जाणून घेवून त्यावर योग्य उपचार , उपाय याद्वारे निराकरणासाठी प्रयत्न केले गेले.
मनोरंजनात्मक गीतांनी कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर श्रीमती पवार यांनी या विशेष उपक्रमाचे महत्त्व विषद केले. के ई एम मधील तज्ञ डॉक्टर टीमने पडद्यावर सचित्र माहिती सांगून ज्येष्ठांना आश्वासित केले. डॉ. पारिजात यांनी सतर्कतेचे महत्व सांगून डॉ.करिश्मा,डॉ. साधना भातखंडे यांनी त्यावर प्रबोधन केले.सूचक मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तरे याचा या सत्रात समावेश होता.
यावेळी श्री. महेश पाटील (वार्ड ऑफिसर), श्री.बिराजदार (डी एम सी),श्री.शरद डीचोलकर, अध्यक्ष फेस्कॉम हे मान्यवर उपस्थित होते. श्री.वसंत सुतार आणि श्रीम.रुपाली खेडेकर(सी डी ओ)यांनीही येवून कार्यक्रम यशस्वी केला.
ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. त्यासाठी कविता शिंदे,शैला शिवदे( सी डी ओ), खाडे मॅडम यांनी व्यवस्था ठेवली होती.मनीष पाटील, रंजना कटके, भाग्यश्री सराफ,ऋता शेट्ये यांचेही सहकार्य लाभले.
विभागातील बचत गटातील ज्येष्ठ महिला तसेच स्वामी परळ,अभ्युदय नगर,कृष्णाई, नायगाव मंडळ,अभय इ. ज्येष्ठ नागरिक संघ यांनी याचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी चहापान व अल्पोपहार देण्यात आला.
खास ज्येष्ठांसाठी आयोजिलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई स्थीत परंतु मूळ देवगड तालुक्यातील शिरगांव येथील सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, समाजसेवक व लोकप्रिय सूत्रसंचालक अनिल तावडे यांनी केले.
या उपक्रमाला उपस्थीत असलेल्या सर्व ज्येष्ठांनी समाज विकास अधिकारी तृप्ती पवार व त्यांचे सहकारी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)