ओटव नांदगाव प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली अन्न विविधता...!
भाजी, फळे, मासे व्यापाऱ्यांची घेतली क्षेत्रभेट .
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
इयत्ता चौथी मधील परिसर अभ्यासातील घटक – अन्नातील विविधता या उपक्रमांतर्गत भाजी, फळे , मासे विक्रेत्याला भेट या सदराखाली जि .प शाळा ओटव नांदगाव यांनी नुकतीच नांदगाव येथील बोभाटे यांच्या भाजीच्या दुकानाला भेट दिली. बोभाटे यांना विविध प्रश्न विचारून विविध भाज्या फळे यांविषयी माहिती मिळवली तसेच मासे विक्री करणाऱ्या महिलेची ही भेट घेऊन माशांविषयी माहिती घेतली. मुलांसोबत पत्रकार ऋषिकेश मोरजकर, मुख्याध्यापक आनंद तांबे, सहकारी शिक्षिका रूपाली उपस्थित होते. तद्नंतर ऋषिकेश मोरजकर यांच्या महा-ई-सेवा केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांनी विविध विषयक भरण्यात येणाऱ्या दाखल्यांविषयी माहिती घेतली. नांदगाव तिठ्यावरील ऋषिकेश मोरजकर,भाई मोरजकर, नांदगाव मधलीवाडी प्रशालेच्या शिक्षिका मानसी मोरये , सुरेंद्र शेलारयांनी खाऊ वाटप केले व उपक्रमाचे कौतुक केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)