ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली तालुका ई - पीक पाहणीमध्ये पहिल्या क्रमांकावर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली तालुका ई - पीक पाहणीमध्ये पहिल्या क्रमांकावर.

प्रकाशन: 13 Oct 2022 06:35 PM
वाचन संख्या 29

जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदार आर. जे. पवार यांच्या कामाचे कौतुक.

कणकवली | ब्यूरो न्यूज : ई – पीक पाहणी करिता महसूल विभागाकडून गेले काही दिवस आढावा बैठकींचे सत्र सुरू असून दस्तूरखुद्द सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी या ई – पीक पाहणी च्या कामकाजाचा नियमित आढावा घेत आहेत. गेले दोन दिवस कणकवली तहसीलदार आर. जे. पवार हे ई – पीक पाहणीच्या आढाव्याकरिता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आढावा घेत आहेत. प्रत्येक मंडळामध्ये भेटी देत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून तहसीलदार आर. जे. पवार यांनी आढावा भेटीचे सत्र सुरू केले आहे. या दरम्यान ते फोंडाघाट येथे असताना प्रत्यक्ष भात शेतीच्या बांधावरूनच तहसीलदार आर. जे. पवार यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना ई – पीक पाहणीच्या कामाचा कणकवली तालुक्याचा आढावा दिला. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई – पीक पाहणीमध्ये एकूण झालेल्या कामात आजपर्यंत कणकवली तालुका हा पहिल्या स्थानी असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी ई – पीक पाहणी आढाव्यामध्ये तहसीलदार आर. जे. पवार यांचे कौतुक देखील केले.

ई. – पीक पाहणीकरिता शासन स्तरावरून सातत्याने आढावा घेतला जात असताना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यादेखील याकरिता आग्रही आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेत असताना जरी फिल्डवर शेतामध्ये असलात तरी इंटरनेट सुविधा पाहून आहात त्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सला जॉईन व्हा अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या व त्यानुसार कणकवलीचे तहसीलदार थेट फोंडाघाट येथे शेताच्या बांधावरूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले. जवळपास पाऊण तास या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावरूनच तहसीलदार पवार सहभागी झाले.

१५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ई – पीक पाहणी करण्याकरिता शासनाने मुदत दिली असून, कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी जास्तीत जास्त करा असे देखील आवाहन तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स