सावित्रीबाई पालक योजना अंर्तगत बांदा, नेतर्डे जिल्हा परिषद केंद्रशाळेतील २ विद्यार्थिनी दत्तक.
बांदा | राकेश परब :
बांदा येथील गोगटे -वाळके महाविद्यालयाचे प्रा. रमाकांत गावडे यांनी आज बांदा निमजगा प्राथमिक शाळा व नेतर्डे जिल्हा परिषद केंद्रशाळेतील २ विद्यार्थिनी सावित्रीबाई पालक योजनेतून दत्तक घेतल्या. येत्या दोन वर्षात सावंतवाडी तालुक्यातील १०० विद्यार्थिनी दत्तक घेण्याचा संकल्प प्रा.गावडे यांनी व्यक्त केला आहे.
प्रा. गावडे यांनी यापूर्वी चौकूळ प्राथमिक शाळा, बांदा केंद्रशाळा, सावंतवाडी शहरातील शाळांमधील विद्यार्थिनी दत्तक घेतल्या आहेत. आज निमजगा व नेतर्डे शाळेत त्यांनी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
बांदा निमजगा येथे शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष संदीप बांदेकर, बांदा केंद्रशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, पालक शिवराम बहिरे, प्रशांत गवस, शैलेश शेटकर, समीर मयेकर, उपशिक्षका सुपर्णा भाईप, लुईजा गोन्सालवीस, मंगल हाडबे, मालू लांबर उपस्थित होते.
नेतर्डे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक दयानंद गवस, शिक्षक अमोल प्रभूझाटये, गजानन कर्पे, सुनील जाधव, विजय शिंदे आदी उपस्थित होते. दोन्ही शाळांना प्रत्येकी ३ हजार रुपये धनादेश देण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)