ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
माणूस जातीने नव्हे गुणाने मोठा ; कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन.

माणूस जातीने नव्हे गुणाने मोठा ; कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन.

प्रकाशन: 13 Oct 2022 04:33 PM
वाचन संख्या 31

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : जगात कोणताही माणूस हा जातीने मोठा होत नसून आपल्या गुणांनी मोठा होतो असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या ४२ व्या अधिवेशनाप्रसंगी केले.
वेस्ट हायकोर्ट रोडवरील जवाहर विद्यार्थी गृह येथे आयोजित या एक दिवसीय अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची उपस्थिती होती.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक सुधारणेचा मंत्र दिला. बाबासाहेब हे एका जातीचे नेते नसून संपूर्ण समाजाचे नेते होते.अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग यांनी कृष्णवर्णीय लोकांसाठी लढा दिला तसाच लढा बाबासाहेब आंबेडकरांनी येथील दलित शोषित आणि वंचित समाज समाजासाठी दिला.भगवान बुद्ध यांच्या शरणी जाऊन सामाजिक समतेवर आधारित असा बौद्ध धर्म नागपूर येथे स्वीकारत त्यांनी नवीन इतिहास घडवला. बाबासाहेबांचे सामाजिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक विचार तसेच महात्मा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांचे विचार तत्कालीन परिस्थितीला अनुरूप असेच होते, या तिघांनी केलेल्या कार्यामुळेच सामाजिक सुधारणा आणि सामाजिक विकास यात भर पडली यांच्या कार्यामुळेच देशाच्या 75 वर्षाच्या काळात शिक्षण हे तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचले. आजच्या काळात शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना उद्यमशीलतेचे कौशल्य शिकविले गेले पाहिजे. सामाजिक चळवळ आता आर्थिक चळवळ कशी होईल याचा विचार आता वंचित वर्गातील विद्यार्थी आणि सुधारकाने केला पाहिजे.
जगाला बुद्धाची खरी ओळख व्हावी याकरिता 25 हजार कोटीचे बुद्ध सर्किट योजना सुरू झाली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव नामदेवराव कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी केले.यावेळी राज्यातील अनेक आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.शिक्षक बँक निवडणुकीत निवडून आलेल्या शिक्षकांचा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स