ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सरस्वती पूजन निमित्त निगुडेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप...!

सरस्वती पूजन निमित्त निगुडेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप...!

प्रकाशन: 13 Oct 2022 03:30 PM
वाचन संख्या 31

बांदा | राकेश परब :
निगुडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ सरस्वती पूजनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मुंबई येथील उद्योगपती श्री. दीपक अगरवाल यांच्या सौजन्याने निगुडे जिल्हा परिषद शाळा नंबर १ मधील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, बिस्किट वाटप तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे स्वामी दयानंद सरस्वती छात्रालय रोणापाल या ठिकाणीही विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गजानन नरसुले यांच्यामार्फत वह्या वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी रोणापाल गावचे सरपंच सुरेश गावडे, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, पोलीस पाटील सुचिता मयेकर, ग्रामपंचायत सदस्या समीक्षा गावडे, सामाजिक कार्यकर्ते श्री देऊलवकर, जिल्हा परिषद मुख्याध्यापक विजय नेमळेकर, सहशिक्षक शांताराम असनकर, श्री. होंडे तसेच पालक ग्रामस्थ आदी उपस्थित होते हा कार्यक्रम गेली बारा वर्षे गजानन (काका) नरसुले यांच्या सहकार्याने आयोजित केला जातो शाळेचे सहशिक्षक श्री होंडे यांनी सर्वांचे शाळेच्या आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स