ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मडुरा सोसायटीची वार्षिक सभा  संपन्न...!

मडुरा सोसायटीची वार्षिक सभा संपन्न...!

प्रकाशन: 13 Oct 2022 03:34 PM
वाचन संख्या 30

बांदा |राकेश परब :
मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या शेतकरी सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. आगामी काळात शेतकरी सभासदांना योग्य वेळी खत पुरवठा करण्यासाठी सोसायटी प्रयत्नशील राहणार असल्याचे चेअरमन संतोष परब यांनी स्पष्ट केले.
मडुरा सोसायटीची वार्षिक सभा चेअरमन संतोष परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष जगन्नाथ परब, संचालक उल्हास परब, ज्ञानेश परब, प्रकाश गावडे, यशवंत कुबल, आत्माराम गावडे, प्रकाश सातार्डेकर, चंद्रकांत परब, उत्तम जाधव, सौ. स्वप्नाली परब, सौ. सुनंदा परब, गटसचिव सुभाष राऊळ उपस्थित होते.
सभेत दहावी व बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या सभासद पाल्यांचा सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला. सभेने व्यवस्थापक मंडळाच्या कामकाजाचा अहवाल, नफा – तोटा पत्रक व ताळेबंदाला मंजुरी देण्यात आली. सोसायटीतर्फे शेतकर्‍यांना योग्य वेळेत खतपुरवठा होत नसल्याची तक्रार सुरेश गावडे यांनी केली. यावर चेअरमन संतोष परब यांनी आगामी काळात वेळेत खतपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, दिलीप परब, यशवंत माधव, तात्या शेर्लेकर, अण्णा नाईक यांनी चर्चेत सहभाग घेतला. मडुरा तलाठी व्ही. एस. कविटकर यांनी सभेत शेतकर्‍यांना ई पिक नोंदणी बाबत मार्गदर्शन केले. मडुरा, रोणापाल व निगुडे गावातील सभासद उपस्थित होते. यावेळी नकुळ परब, नारायण परब, दत्ताराम परब, आनंद परब, सुनील नाईक, लिपीक प्रकाश जाधव, सेल्समन सोमनाथ परब, कॉम्प्युटर ऑपरेटर सिया परब, कोतवाल नाना वेंगुर्लेकर आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्हास परब यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स