ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गणित सुधार अध्ययन संस्था आयोजित विभाज्यता ऑलिंपिक स्पर्धा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गणित सुधार अध्ययन संस्था आयोजित विभाज्यता ऑलिंपिक स्पर्धा संपन्न.

प्रकाशन: 12 Oct 2022 04:00 PM
वाचन संख्या 71

मालवण तालुक्यातून हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा ठरली अव्वल.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : गणित सुधार अध्ययन संस्था आयोजित विभाज्यता ऑलिंपिक स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. गणित सुधार उपक्रमा अंतर्गत ६ वी आणि ७ वी साठी या वर्षी (२०२२-२३) विभाज्यता, चिन्ह संबोध यांचा समावेश असतो. या संपूर्ण उपक्रमात मालवण तालुक्यातील १५ शाळांची निवड संस्थेने केली होती. या उपक्रमात विद्यार्थ्यांची पूर्वचाचाणी, शिक्षकांचे कृतिसत्र, शिक्षकांनी दिलेल्या साहित्याच्या आणि प्रकीयांच्या आधारे शिकवणे, शिकवल्यानंतरची उत्तर चाचणी, उत्तर चाचणीनंतर विद्यार्थ्याचे ऑलिंपीक होते. सदरची मालवण तालुक्याची ऑलिंपीक ११ ऑक्टोबरला मालवणात बॅ. नाथ पै सेवांगण येथे संपन्न झाले. या आलिंपीकमध्ये मालवण तालुक्यात हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा पिरावाडी या शाळेने अव्वल क्रमांक मिळवला. शाळेने हे यश संपादन केल्याबद्दल आचरा गावचे माजी सरपंच तथा शिक्षण प्रेमी सदस्य अनिल करंजे यांनी कु. रुद्र बागवे, संस्कार पवार आणि सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका स्मिता परब यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना करंजे म्हणाले, की आपली शाळा गुणवत्तेमध्ये अग्रेसर आहे. त्यामुळेच पिरावाडीच्या बाहेरील ३५ ते ४० विद्यार्थी आपल्या शाळेत येत आहेत. शाळेचा नावलौकिक वाढविणे केवळ तुमच्या हातात आहे. हा नावलौकिक सतत वाढत राहो. यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना शुभेच्छा. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ व माता पालक संघ यांनी मुलांचे अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स