ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
किरण उर्फ भैयाशेठ सामंत १५ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार ; कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

किरण उर्फ भैयाशेठ सामंत १५ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार ; कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य.

प्रकाशन: 12 Oct 2022 03:05 PM
वाचन संख्या 59

देवगड,मालवण,कुडाळ व कणकवली तालुक्याला देणार भेटी.

कणकवली | ब्युरो न्यूज : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे आगामी लोकसभा निवडणूकीतील संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जातात. किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांचा १५ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौरा असून या दौऱ्याच्या निमित्ताने प्रथमच ते राजकीय पार्श्वभूमीवर जिल्ह्याला भेट देणार आहेत.
किरण सामंत यांच्या या पहिल्यावहिल्या राजकीय व संघटनात्मक दौऱ्यामुळे कार्यकर्त्यां मध्ये चैतन्य असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांचे स्वागत करणार आहेत.

१५ ऑक्टोबर रोजी किरण ऊर्फ भैय्याशेठ सामंत हे सकाळी १० वाजता देवगड शाखा येथे भेट देणार असून कार्यकर्त्यांशी संघटनावाढी बाबत चर्चा करणार आहेत. दुपारी ११:३० वाजता ते आचरा येथील राजन पांगे यांच्या घरी भेट देणार असून देवस्थान कमिटी चर्चा आणि चिरे – वाळू संघटना यांच्या सोबत चर्चा करणार आहेत असे सूत्रांकडून समजते.
दुपारी १२ वाजता ते आचरा येथील हॉटेल राणे शाही येथे भेट देत कार्यकर्त्यांशी संघटनावाढी बाबत चर्चा करणार आहेत. दुपारी २ वाजता मालवण हॉटेल रामेश्वर, सागरी महामार्ग येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी संघटनावाढीबाबत संवाद साधणार आहेत, दुपारी ३ वाजता मालवण देवबाग संगम येथे भेट देऊन धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची पाहणी करणार आहेत तर सायंकाळी ४:३० वाजता कुडाळ येथे कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
सायंकाळी ५:३० वाजता कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयाला भेट देणार आहेत. संध्याकाळी ते कोकणकन्या एक्स्प्रेस रेल्वेने रत्नागिरीला रवाना होणार आहेत असे सूत्रांकडून समजते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स