चाफेड भोगलेवाडी येथे कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी…!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील श्री.गायगोठण गणपती मंदिरात दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा केला जातो.यावर्षीही मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देऊन बक्षिसे देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यावर्षी तोंडातुन फुगे आणणे,चमचा गोटी कथा कथन,इंग्रजी कविता गायन.भक्ती गीत गायन, संगित खुर्ची,आयत्या वेळच्या विषयावर बोलणे,रेकाॅर्ड डानास,पायाला फुगा बांधुन फोडणे ई.मनोरंजक खेळ घेण्यात आले.तसेच १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थांचा सत्कारही करण्यात आला.कार्यक्रमाचे संयोजन वाडीतर्फे केंद्रप्रमुख श्री. विजय भोगले यांनी केले होते.याला वाडीतील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला
यावर्षी प्रथमच होम मिनिस्टर ही स्पर्धा घेऊन सौ.प्रियांका भोगले व पंढरीनाथ कांडर यांच्यावतीने महिलांना पैठण्या देण्यात आल्या. यावेळी वाडितील सर्व अबालवृद्ध उपस्थित होते.शेवटी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेऊन गरबा नृत्य करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विजय भोगले आणि सौ. प्रियांका भागले यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)