लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तलाठी कार्यालयात कारवाई.
मंगळवारी दाभोळे तलाठी यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तहसिलदारांनी दिलेल्या आदेशानुसार आपल्या वडिलांच्या शेतजमिनीच्या 7/12 उता-यावरती कुळ म्हणुन नोंद करण्यासाठी दाभोळे तलाठी उत्त्म गंगाराम कदम यांनी पाच हजाराची लाच मागून तडतोडीने तीन हजार रुपये लाच स्वीकारत असताना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी 2.45 वा. सुमारास तलाठी कार्यालय दाभोळे येथे रंगेहाथ पकडले आहे.
दाभोळे गावातील एका शेतक-याच्या वडिलांच्या नावाच्या 7/12 वरती तहसिलदार यांनी कुळ म्हणून नोंदणीचा आदेश दिला होता. सदर 7/12 दप्तरी कुळाची नोंद करण्यासाठी त्या शेतक-याच्या मुलाने दाभोळे तलाठी उत्तम कदम यांच्याकडे अर्ज केला होता. सदरचे कुळाची नोंद करण्यासाठी दाभोळे तलाठी उत्त्म गंगाराम कदम यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीने तीन हजार रुपयाची तडजोड करुन सदरची लाचेची रक्कम मंगळवारी दुपारी 2.45 वा सुमारास तलाठी कार्यालयामध्ये तलाठी उत्त्म गंगाराम कदम यांनी तक्रार दारांकडून स्वीकारताना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
या पुर्वी दोन वर्षापुर्वी अनेक तलाठयांना देवगड तालुक्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. तालुक्यातील शेतक-यांच्या 7/12 उतारावरती नोंद करण्यासाठी लाचेची मागणी तलाठी वर्गामधून होत असल्याने देवगड महसुल विभाग गेल्या काहि वर्षामध्ये लाच स्वीकारणारा विभाग अशी ओळख निर्माण झाली आहे. सदरची कारवाई हि सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अप्पर पोलीस आयुक्त ठाणे पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधिक्षक अनिल घेरडीकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सिंधुदुर्ग डि वाय एस पी दिपक कांबळे,पोलीस निरिक्षक शिवाजी पाटील,पोलीस निरिक्षक आस्मा मुल्ला,सहा. पोलीस उपनिरिक्षक भार्गव फाले,जनार्दन रेवंडेकर, रवि पालकर,जितेंद्र पेडणेकर,प्रथमेश पोतनिस,कांचन प्रभू यांनी केली आहे.या बातचा अधिक तपास सदर गुन्हयातील तपास अधिकारी पोलीस निरिक्षक शिवाजी पाटील करीत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)