देवगड तालुक्यातील वाडा केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख सुदाम जोशी यांना राज्यस्तरीय आठवा "कोकण गौरव पुरस्कार" प्रदान.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
हुतात्मा अपंग बहुउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था, कराड यांच्यावतीने राज्यस्तरीय आठवा कोकण गौरव पुरस्कार २०२२ सन्मानपत्र शैक्षणिक सेवा गौरव हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाडा केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख सुदाम महादू जोशी यांना देण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील फडतरे हे उपस्थित होते.
निसर्गच राहिला इथे सृष्टिला घेवून कायमचा मुक्कामी सप्तरंगांची उधळण करते, कोकणामध्येही परशुरामाची भूमी चांदयापासून बांध्यापर्यंत, हिरव्या हिरव्या वनराईला कशाची ना कमी. या इथे स्वर्ग उतरला तुम्ही-आम्ही…हि नवरत्नांची खाण अन् पिकले माणिक मोती, कला गुणांची उतराई म्हणून घातला इंद्रधनुचा मांडव. साद घालूनी हाक मारतो, करतो आठवा कोकण गौरव सुदाम जोशी (देवगड, सिंधुदुर्ग) यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून २०२२ चा शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आला. आपल्या या कार्याचा सुगंध आणि मधुगंध इथल्या द या खोयात, काजू, आंबा, फणसात, करवंदात. इथल्या पावन कुशीत मातीत, सदैव दरवळावा आणि सागरांच्या गजलांटाना ऐकू जावो. इथे प्रत्येक क्षणाक्षणाला कणाकणाला हृदयातील तना मनाला पानगडीच्या रानावनाला, रसिकांच्या ऐकिव कानाला, केतकिच्या बनाला, आंब्याच्या बनाला, असा भिढ़ावा आपले असेच कार्य पाहून क्षणभर निर्सगच हसावा. केंद्रप्रमुख सुदाम जोशी हे दिव्यांग संघटनेचे देवगड तालुकाध्यक्ष आहेत. यांनी २९ वर्षे शिक्षण सेवा केली. याकाळात त्यांनी विविध समाजोपयोगी कामे केली. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सहकार्य, पेन्शन केस, डोळ्यांचे ऑपरेशन केसेस, इंदिरा गांधी पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना, सर्वसामान्यांना मदत, कोरोना काळात गरिबांना, निराधार कुटुंबांना मदत, शालेय मुलांना दप्तर वाटप अशी विविध समाजोपयोगी कामे केली.याबाबत सरपंच सुनील जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश गुरव, मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा ढाकणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)