ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने वजराठ येथील ग्रामदैवत श्री. देव गिरेश्वर मंदिरात अभिषेक व धार्मिक कार्यक्रम..!

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने वजराठ येथील ग्रामदैवत श्री. देव गिरेश्वर मंदिरात अभिषेक व धार्मिक कार्यक्रम..!

प्रकाशन: 12 Oct 2022 10:18 AM
वाचन संख्या 72

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील बारा जोतीर्लिंगां पैकी एक असलेल्या महाकाल मंदिराच्या परीसराचा सुशोभिकरण आणि सुविधा या कामांचा शुभारंभ केला. हा सोहळा संपुर्ण देशभरात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला.
महाराष्ट्रातही प्रदेश नेतृत्वाने हा सोहळा प्रत्येक मंडळातील शंकराच्या देवळात पींडीवर अभिषेक करुन भक्तीमय वातावरणात साजरा करण्याचे ठरवले.
भाजपा वेंगुर्लेच्यावतीने वजराठ येथील ग्रामदैवत श्री देव गिरोबा मंदिरातही अशाच पद्धतीने कार्यक्रम करण्यात आला. यावेळी वजराठ गावातील प्रथम मानकरी सूर्यकांत परब यांच्या हस्ते बेलपत्राने अभिषेक करण्यात आला. तसेच सर्व ग्रामस्थांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू धर्मासाठी करत असलेल्या कामाची माहिती देण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ स्मिता दामले, ता.चिटणीस नितीन चव्हाण, वजराठ उपसरपंच नितीन परब, ता.उपाध्यक्ष संतोष गावडे, बुथप्रमुख वसंत परब, रविंद्र शिरसाठ, वामन भोसले, विकास चव्हाण, मेघशाम परब, उदय सोंसुरकर, गणपत परब, दशरथ वजराटकर, बाळू राणे, संजय राणे, चंद्रकांत राणे व वजराट ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स