ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवण नगरपरिषद हद्द ही पाक तथा नेपाळ मध्ये आहे की काय : सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष व समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत यांचा सवाल.

मालवण नगरपरिषद हद्द ही पाक तथा नेपाळ मध्ये आहे की काय : सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष व समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत यांचा सवाल.

प्रकाशन: 11 Oct 2022 07:01 PM
वाचन संख्या 196

मालवण नगरपरिषद हद्दितील अंगणवाड्यामधील मुलांवर अन्याय होत असल्याची जिल्हाधिकार्यांकडे केली मेलद्वारे तक्रार.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या समाजसेविका व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या तालुका अध्यक्ष सौ.शिल्पा यतीन खोत यांनी मालवण शहरातील नगर पालिका हद्दीतील अंगणवाड्यांमधील मुलांना सरकारी योजनांचा परिपूर्ण लाभ मिळत नाही असे प्रतिपादन केले आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे डिजीटल संदेशाद्वारे तक्रार केली आहे.
महिला बाल विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या सुदृढ बालक स्पर्धेतही पालिका हद्दीतील अंगणवाड्यांमधील मुलांना वगळण्यात आले होते. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करुन मालवण नगरपरिषद हद्दीतील सर्व माता व शिशु वर्गातील मुलामुलींना न्याय देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तथा सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शिल्पा खोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरात पालिका हद्दीत जिल्हा परिषद व पालिकेच्या अखत्यारीत अंगणवाड्या आहेत. यात धुरीवाडा तसेच परिसरातील अंगणवाडी मध्ये गेल्या काही वर्षात कोणीही अंगणवाडी सेविका माहिती संकलनासाठी आलेली नाही. गरोदर मातेच्या आरोग्याची चौकशी होत नाही व नवीन जन्माला आलेल्या अपत्याच्या आरोग्याची अधिकृत विचारपूस होत नाही. गरोदर महिलांना शासनाकडून दिला जाणारा कुठलाच लाभ किंवा नवीन अपत्याला मिळणाऱ्या कुठलाच लाभ या भागात अद्यापपर्यंत दिलेला नाही. याबाबत चौकशी केली असता तुमचे क्षेत्र व हे काम आमच्या अखत्यारीत येत नाही असे उत्तर दिले जाते. यात महिला बालविकास विभागामार्फत नुकतीच सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. यातही शहरातील अंगणवाड्यांमधील मुलांना डावलण्यात आले आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी अंगणवाडी सेविका संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे शहरातील अंगणवाडी मधील मुलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांची तसेच विविध स्पर्धांमध्ये डावलण्यात आल्याच्या प्रकाराची चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी सौ. खोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मालवण नगरपरिषद हद्द ही पाक तथा नेपाळ मध्ये येते का की ज्यामुळे केंद्र शासनाच्या योजनांचा इथल्या लोकांना वापर होत नाही असा उपरोधक सवाल त्यांनी केला आहे.
आता यासंदर्भात संबंधीत सर्व यंत्रणा व अधिकारी यांचे काय स्पष्टीकरण असेल त्याची प्रतिक्षा असून लवकरात लवकर महिला व बालकांच्या या आरोग्याच्या मुद्द्याची दखल घेतली जावी असे आवाहन सौ.शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स