ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खारेपाटण हायस्कूल शिक्षक पालक संघाच्या ३० सदस्यांची कार्यकारणी जाहीर...!

खारेपाटण हायस्कूल शिक्षक पालक संघाच्या ३० सदस्यांची कार्यकारणी जाहीर...!

प्रकाशन: 10 Oct 2022 09:53 PM
वाचन संख्या 96

पदसिद्ध अध्यक्षपदी मुख्याध्यापक श्री. संजय सानप तर श्री.ह्रषिकेश जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड.

Article image

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घकालीन शैक्षणिक परंपरा असलेल्या खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची शिक्षक पालक संघाची जनरल सभा खारेपाटण हायस्कूल येथे नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी शिक्षक पालक संघाची कार्यकारणी स्थापन करण्यात आली.

Article image


शिक्षक पालक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक श्री सानप तर उपाध्यक्षपदी श्री .ऋषिकेश महादेव जाधव यांची निवड झाली.
खजिनदार म्हणून सौ. रिया राजेंद्र चिके व सचिव श्री लक्ष्मीकांत केशव हरयाण यांची निवड करण्यात आली. माता पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी सौ पूजा कासलीवाल, सचिव सौ. आरती मांगले व सहसचिव सौ प्राची कांबळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या कार्यकारणी मध्ये शिक्षक व पालक मिळवून एकूण ३० सदस्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

Article image


आगामी काळात शाळेची शैक्षणीक उन्नती, शिक्षक पालक समन्वय व विद्यार्थी वर्गाचा सर्वांगीण व्यक्तीमत्व विकास यासाठी ही कार्यकारणी काम करणार असल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स