ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीत उद्या मनसे तर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देणार : उप जिल्हाध्यक्ष दया मेस्त्री.

कणकवलीत उद्या मनसे तर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देणार : उप जिल्हाध्यक्ष दया मेस्त्री.

प्रकाशन: 10 Oct 2022 10:29 PM
वाचन संख्या 42

नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर पोचून पंचनामे करावेत अशी करणार मागणी.

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे मनसे तर्फे उद्या प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे मनसे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री यांनी जाहीर केले आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी हा चिंतेत आहे. तोंडी आलेला घास पुनःश्च त्याच्या तोंडातून निघून गेलाय. मात्र शासन प्रशासन अद्यापही निश्चल असल्याचे पहावयाला मिळते आहे असे दया मेस्त्री यांनी स्पष्ट केले आहे.
अगदी पेरणी पासून ते भात कापणीपर्यंत शेतकरी आपल्यासह कुटुंबाचे पोट भरण्यासाठी राबत असतो. मात्र त्या सगळ्या कष्टावर पावसाचे पाणी पडते आणि तोंडी आलेला घास दुरावतो.
शेवटी शेतकऱ्याला अपेक्षा राहते ती फक्त शासकीय मदतीची म्हणजेच नुकसानभरपाईची. असे असतानाही शासन प्रशासनाच्या पायऱ्या त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चढाव्या लागतात. मग हे अधिकारी फक्त कार्यालयात बसून करतात तरी काय, शेतकऱ्यांनी करायचे काय , कोणीतरी प्रशासकीय अधिकारी येणार, पाहाणी करणार आणि आपल्या झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई देणार अशा अनेक विचारात शेतकरी जगत आहेत. आता भात कापणीला सुरुवात होईल तोपर्यंत अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली. तोंडाशी आलेला घास दुरावला किमान आता तरी महसूल प्रशासन या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणार आहे आणि ती नेमकी कधी देणार आहे याबाबत उद्या सकाळी १० वाजता प्रांताधिकारी कणकवली यांना मनसेच्या वतीने निवेदन देणार असल्याची माहिती दया मेस्त्री यांनी दिली आहे .
शासन, प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानीचे पंचनामे करावेत अशा सूचना देखील निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी केल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स