ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
ह्यूमन राईट असोसिएशन कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी जिल्हावासियांना दिला सावधगिरीचा संदेश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ह्यूमन राईट असोसिएशन कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी जिल्हावासियांना दिला सावधगिरीचा संदेश.

प्रकाशन: 10 Oct 2022 07:29 PM
वाचन संख्या 155

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ह्यूमन राईट असोसिएशनचे’ कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी जिल्हावासियांना दिला सावधगिरीचा संदेश दिला आहे.

सध्या जिल्ह्यातील नागरिकांना व्यापक प्रणाणावरील विविध प्रकारची आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचे व त्यानंतर पैशाची लुबाडण्याचे प्रकार वाढत आहेत .याकरिता गुन्हेगार रोज नवनवीन विविध प्रकारच्या युक्त्या – क्लृप्त्या व तंत्रज्ञान यांचा वापर करीत आहेत. या प्रकारांना ओळखून वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. त्याकरीता जिल्हा पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेच.परंतु नागरिकांनी देखील अनोळख्या व्यक्तीवर सहजपणे तात्काळ विश्वास टाकून व कसल्याही प्रकारच्या आमिषाला किंवा प्रलोभनांना बळी पडून फसवणुकीची शिकार होऊ नये.

याउलट आपल्या बाबतीत अथवा आपल्या परिसरात एखादी संशयास्पद अथवा अनुचित प्रकार घडत असल्यास त्याबाबत लागलीच जवळच्या पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून निःसंकोचपणे आवश्यक ती संपुर्ण माहिती द्यावी.जेणेकरून पोलिस यंत्रणेला देखील तपास व दक्षता कामात मदत होईल व अशा प्रकारांना घटनांना आळा बसून नागरिकांना सुरक्षित जीवन जगता येईल असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व राजेश जाधव यांनी केले आहे. काल एका अज्ञात व्यक्तीने सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांना फोनद्वारे संपर्क साधून आपली पूर्वी भेट झाली असल्याचे सांगत ओळख भासवली.तसेच आपले एक महत्वाचे काम आहे असे सांगून त्याबाबतीत गोपनीयता बाळगण्याची सूचना जाधव यांना केली.जाधव यांनी त्या अज्ञात व्यक्तीचे संपूर्ण बोलणे ऐकून घेतले व त्या संभाषणातून प्राप्त झालेल्या माहितीबाबत साशंकता बाळगून त्याविषयी त्वरित संबंधित पोलीस यंत्रणेला सर्वतोपरी कल्पना दिली. संबंधित पोलीस यंत्रणेने देखील तात्काळ जाधव यांना मार्गदर्शन करून सावध केले. त्याबद्दल संबंधित पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त करून लोकहितास्तव व जनजागृतीस्तव सामाजिक कार्यकर्ते व ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी जिल्हावासीयांकरिता दक्षतेचे आवाहन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स