भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे भाजपा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशाल महोत्सवात शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे यावेळी मिस्टर वर्ल्ड, मि. आशिया, मि. इंडीया, व महाराष्ट्र श्री चॅम्पिअन पूणे येथील महेंद्र चव्हाण, यांचा बॉडी बिल्डिंग शो, तसेच मि वर्ल्ड , मि. आशिया, टॉपफायनालिस्ट, मि. ऑलिंपिक ॲमॅच्योर मंगेश गावडे मुंबई या दोन सेलिब्रिटींजचे बॉडी बिल्डिंग सादरीकरण होणार आहे.
ही जिल्हास्तरीय स्पर्धा खुली असल्याने व कोणत्याही असोसिएशनशी निगडीत नसल्याने जिल्यातील 150 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा ५५, ते६० , ६० ते ६५, ६५ ते ७०, ७० ते ७५, व ७५ किलो वरील अशा वजनी गटात होणार आहे.
या स्पर्धेसाठी ३०००, २५००, २०००, १५००, व १००० अशी बक्षिसे प्रत्येक गटांसाठी असणार आहेत.
तसेच मेन फिजीकसाठी 3500, ३०००, २५०००, २०००, १५०० व १००० अशी सहा बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तसेच बेस्ट पोझर २५००, मोस्ट इंप्रो २५००, व बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप साठी १०,००० चे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना चषक व मेडल देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी गोवा पार्से येथील मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर, तसेच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, युवा नेते विशाल परब व जिल्ह्यातील भाजपाचे मान्यवर, पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी जास्तीत जास्त स्पर्धकांनी व बॉडी बिल्डिंग शो पहाण्यासाठी युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विशाल परब मित्रमंडळाचे प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, प्रणव वायंगणकर, व साई भोई यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)