ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीत विशेष दिवाळी बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणेंच्या हस्ते १९ ऑक्टोबरला होणार : नगराध्यक्ष समीर नलावडे .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीत विशेष दिवाळी बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणेंच्या हस्ते १९ ऑक्टोबरला होणार : नगराध्यक्ष समीर नलावडे .

प्रकाशन: 08 Oct 2022 03:17 PM
वाचन संख्या 30

स्थानिक कुशल कलावंत, बचत गट यांना मिळणारी व्यापक बाजारपेठ असेल हा विशेष दिवाळी बाजार.

गेल्यावर्षी मिळाला होता तुफान प्रतिसाद.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहर आणि परिसरातील बचतगटांकडून तयार होणारा फराळ, तसेच विविध कलावंताकडून तयार होणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी कणकवली शहरात यंदाही विशेष दिवाळी बाजार भरणार आहे. आमदार नितेश राणे यांच्याहस्ते १९ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

Article image
आमदार नितेश राणे .

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याबाबतची माहिती आज नगराध्यक्ष दालनात दिली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे उपस्थित होते. श्री. नलावडे म्हणाले, शहर आणि परिसरातील बचतगट मोठ्या प्रमाणावर दिवाळी फराळ करतात. तर शहरातील अनेक छोटे उद्योजक कंदील, पणत्या, उटणे आदी साहित्याची निर्मिती करतात. या उत्पादनांना एकाच छताखाली बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी गतवर्षी शहरातील सेवा रस्त्यालगत स्वतंत्र दिवाळी बाजार भरवला होता. त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर यंदा देखील दिवाळी बाजार भरणार आहे.
या बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्याहस्ते १९ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. तर २३ ऑक्टोबर पर्यंत हा दिवाळी बाजार सुरू राहणार आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की गतवर्षी दिवाळी बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. बचतगटांच्या उत्पादनांनाही मागणी वाढती राहिली. तसेच अनेक स्थानिक कलावंतांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली. त्यामुळे यंदाच्या दिवाळी बाजारात देखील दिवाळी फराळाबरोबरच बांबू च्या काठीपासून तयार केलेले कागदी आकाशकंदील, कुंभारांच्या हस्ते कलेतील मातीचे कंदील, मातीचे दिवे, मातीचे शो पीस, इमिटेशन ज्वेलरी, चहा, सरबत स्टॉल असे एकूण ३५ स्टॉल असणार आहेत. या स्टॉलसाठी स्टॉल आणि लाईट व्यवस्था मोफत केली जाणार आहे. या स्टॉल साठी नगरसेविका मेघा गांगण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री. नलावडे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स