ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा येथे काणेकर कुटुंबीयातर्फे कोजागिरी पोर्णिमा निमित्त साईबाबा उत्सवाचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा येथे काणेकर कुटुंबीयातर्फे कोजागिरी पोर्णिमा निमित्त साईबाबा उत्सवाचे आयोजन.

प्रकाशन: 08 Oct 2022 04:59 PM
वाचन संख्या 21

सकाळी श्री साई बाबांची महापूजा होणार संपन्न.

यंदा आहे उत्सवाचे ६९ वर्ष.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा बाजारपेठेत दरवर्षी प्रमाणे श्री काणेकर कुटुंबियांतर्फे कोजागिरी पोर्णिमा निमित्त श्री साईबाबांचा उत्सव साजरा होत असतो. याहीवर्षी तो भक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. यंदा या उत्सवाला ६९ वर्षे पूर्ण होत आहे. या उत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती काणेकर कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला रविवारी सकाळी १० वाजता श्री. साईबाबांची महापुजा दुपारी १२ वाजता श्री साईबाबांची आरती दुपारी १ ते ३ वाजेपर्यत महाप्रसाद
संध्याकाळी ४ वाजल्यापासुन तिर्थप्रसाद व रात्री ९ वाजता पहिल्या सत्रात गोव्यातील नामवंत भजनी कलाकार श्री.पांडुरंग राऊळ. श्री.विठ्ठल शिरोडकर .श्री प्रल्हाद गवस आणि त्यांचे सहकलाकार यांचा पारंपारीक भजनाचा कार्यक्रम होईल. त्या नंतर दुसऱ्या सत्रात रात्री ठीक ११ वाजता जेष्ठ संगीतकार, रचनाकार व गायक स्व.पं.जितेंद्र अभिषेकी बुवा यांचे सत्शिष्य पं. हेमंत पेंडसे (पुणे ) यांचा शास्त्रीय/उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
त्यांना साथसंगत पं.श्री तुळशीदास नावेलकर (गोवा) व संवादिनी:- श्री राया कोरगांवकर (गोवा) हे करतील
त्यानंतर तिसऱ्या सत्रात डॉ श्री राम देशपांडे यांचे शिष्य श्री नहुष लोटलीकर (गोवा) यांचा शास्त्रीय/उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना साथसंगत – श्री सुनाद राया कोरगांवकर ( हार्मोनियम )
श्री बुद्देश तळकर (तबला) हे करतील. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती काणेकर कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स