ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
कणकवलीत श्वानांचे निर्बिजीकरण व ॲन्टी रेबीज लसीकरण मोहीम सुरु.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवलीत श्वानांचे निर्बिजीकरण व ॲन्टी रेबीज लसीकरण मोहीम सुरु.

प्रकाशन: 08 Oct 2022 03:05 PM
वाचन संख्या 56

कणकवली नगरपंचायत व व्हेटस् फाॅर ॲनिमल यांचा संयुक्त उपक्रम.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत हद्दीतील श्वानांना पकडणे व त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रीया करणे, औषधोपचार करून त्यांना मूळ अधिवासात सोडणे या कामाकरीता कणकवली नगरपंचायतीने व्हेट्स फॉर ॲनिमल्स, सातारा या संस्थेची निवड केली आहे.

Article image


त्यामुळे कणकवलीत भटके कुत्रे निर्बीजीकरण करण्यासाठी नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केलं आहे.

कणकवली नगरपंचायत ने कुत्रे निर्बीजीकरण कामावर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवण्याकरीता समिती निधी सावंत, सुप्रिया दळवी, डॉ. सुहास पावसकर, अनुप मोडक यांची गठित केली आहे. त्यानुसार प्राणीक्लेश प्रतिबंध कायदा १९६० महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ प्राणी उत्पत्ती प्रतिबंध नियम, २००१ चे काटेकोरपणे पालन संबंधीत कंत्राटदार यांनी करणे आवश्यक असल्याने याकामी कंत्राटदार व्हेंट्स फॉर ॲनिमल्स, सातारा यांचे कामावर पर्यवेक्षण, नियंत्रण करणे व वरील नमूद कायदे / नियम / सुचनांचे काटेकोर पालन होते किंवा कसे याबाबत खातरजमा करणेसाठी शहरातील या क्षेत्रातील तज्ञ / अनुभवी डॉक्टर / सेवाभावी व्यक्ती / प्राणीमित्र / नागरीकांचा याबाबत लक्ष असणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे समीर नलावडे यांनी कळविले आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स