जखमी गोविंदा प्रथमेश सावंत याची प्राणज्योत मालवली ; दिड महिना दिली मृत्युशी झुंज.
मुंबई | ब्युरो न्यूज : दहीहंडी उत्सवातील अपघातात गंभीर जखमी झालेल्या करी रोड येथील गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. प्रथमेश सावंत (२० वर्षे ) असे या गोविंदाचे नाव आहे. करी रोड येथील साईभक्त क्रिडा मंडळातील जखमी गोविंदाचा गेल्या दिड महिन्याहून अधिक काळापासून मृत्युशी झुंज सुरु होती. मात्र आज शनिवारी सकाळी त्याची प्राणज्योत मावळली.
दहीहंडी पथकातील वरच्या थरातील गोविंदा अंगावर पडल्याने प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पाचव्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यातून प्रथमेशच्या कमरेखालचा भाग बधीर झाला होता.
प्रथमेश सावंत या २० वर्षीय तरुणाला परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी पिरॅमिडमधून पडल्यानंतर त्याच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला, ज्यामुळे त्याच्या शरीरातील संवेदना आणि हालचाल बंद झाली व प्रथमेशवर आयसीयूमध्ये उपचार सुरू झाले होते. त्याला स्नायूंचा पक्षाघात होऊ नये यासाठी डाॅक्टरनी काळजी घेतली होती असे सूत्रांकडून समजते आहे .
प्रथमेशच्या निधनाने समाजातील सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
(फोटो सौजन्य: मुंबई ब्युरो)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)