पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ; आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.
बैठकीत विकासकामांबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची चर्चा.
ओरोस | ब्युरोन्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकासकामांबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक संपन्न झाली.यावेळी विविध विकास कामासंदर्भात लोकप्रतिनिधींशी व अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनीही या बैठकीला उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदींसह लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)