ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साळशी येथील ईनामदार श्री देव सिध्देश्वर पावणाई देवस्थानाचा दसरोत्सव उत्साहात साजरा...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

साळशी येथील ईनामदार श्री देव सिध्देश्वर पावणाई देवस्थानाचा दसरोत्सव उत्साहात साजरा...!

प्रकाशन: 07 Oct 2022 11:56 AM
वाचन संख्या 249

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
‘हर हर महादेव’च्या घोषात व ढोलताशांच्या गजरात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौऱ्याऐंशी  खेड्याचा अधिपती असलेला देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देव सिध्देश्वर पावणाई देवस्थानाचा  दसरोत्सव शाही थाटात पारंपरिक पद्धतीत रितीरिवाजानुसार भाविकांच्या विक्रमी गर्दीत उत्साहात  साजरा करण्यात आला.  हा शाही थाटातील दसरोत्सव सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. या दिवशी दुपारी श्री पावणाई देवी मंदिरात इशारत केली जाते. वस्त्रभूषणांनी सजविलेले देवतरंग (शिवकळा) काढण्यात येतात व शिवकळेकडून सिमोल्लंघनाचा हुकूम झाल्यावर   ढोलताशांच्या गजरात,फटाक्यांची आतषबाजी  हर हर महादेवच्या घोषात देव तरंगाबरोबर निशाणदार, भालदार चोपदार, मशालदार, चौरवीदार, अबदागीर, घडशी गोंधळी, देवाचे सेवेकरी अशा लव्याजम्यासह बारा पाच मानकरी, ग्रामस्थ, असंख्य भक्तगण सिमोल्लंघनासाठी आपट्याच्या झाडाकडे रवाना होतात. तेथे आपट्याच्या झाडाची  ब्राह्मणाकरवी पुजा करण्यात आली. आपट्याच्या झाडांची पाने (सोने) म्हणून लुटण्यात येतात. त्यानंतर माघारी येताना चौऱ्याऐंशीच्या चाळ्याला भेट देतात व नंतर श्री गांगेश्वर-विठ्ठलाई देवीला भेट देण्याचा रिवाज आहे. त्यानंतर श्री देव सिद्धेश्वर, श्री पावणाई देवी व श्री रवळनाथ देवालयाभोवती फेरी मारून पाषाणाची भेट घेतात. त्यानंतर देवता पापडीवर गेल्यावर असंख्य भक्तगण देवास सोने अर्पण करून कृपाशिर्वाद घेतात.  येथील शाही थाटातील दसरा सोहळा ‘याची देही याची डोळा  पाहण्यासाठी व देवदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यादिवशी देवीची ओटी भरण्यासाठी व कृपाशिर्वाद घेण्यासाठी  माहेरवाशिणी येतात. तसेच बाहेर गावस्थित ग्रामस्थ, चाकरमानी आवर्जुन येतात. भाविकांच्या अलोट गर्दीत मंदिर परिसर फुलून गेला होता. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा मंदिराचा परिसर भक्तीमय करून टाकतो.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स