शुक्रवारी आपल्या गावी पळणारे आणि मंगळवारी परत येणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार : जिल्हाध्यक्ष राजन तेली.
कणकवली | प्रतिनिधी : भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांची पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर ते जिल्ह्यात पहिल्यांदाच येत आहेत.भाजपचे पहिले पालकमंत्री जिह्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
म.वि.आ. सरकारच्या काळात शुक्रवारी आपल्या गावी पळणारे आणि मंगळवारी परत येणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच या दौऱ्यात त्या अधिकाऱ्यांना आता राज्यातील सरकार बदललेले असल्याची जाणीव करून दिली जाणार आहे.त्यानंतर तीनही विधानसभा मतदारसंघातील विकास कामे व पक्षीय आढावा मंत्री रवींद्र चव्हाण घेणार आहेत. आगामी काळात सिंधुदुर्गातील रस्ते, पर्यटन विकासासाठी त्यांच्याकडे भरघोस निधीची मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे दिली. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा सरचिटणीस प्रमोद रावराणे, राजन चिके, राजेंद्र रावराणे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाचे नेते, पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शुक्रवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आता नव्याने ३ घाट रस्ते तातडीने होण्याची आवश्यकता आहे. त्यात घोडगे – सोनावडे घाट,आंबोली घाटाला पर्याय केसरी फणसवडे रस्ता, माणगाव खोऱ्यात तून कोल्हापूरला जोडणारा आंजिवडे घाट हा एक रस्ता व्हावा, अशी मागणी जनतेची आहे. तसेच पर्यटनावर आधारित व्यापार वाढीसाठी योजना हाती घेण्यासाठी ठोस धोरण हाती घेण्याची मागणीही आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग झालेले गगनबावडा व फोंडा घाट, आंबोली हे तीनही रस्ते मोठे व्हावेत, कारण या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते. त्या कामांना गती देण्याची आमची मागणी असणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याकडे गेल्या अडीज वर्षात ठाकरे सरकारने दुर्लक्ष केलं असल्याने हे रस्ते होण्यासाठी पालकमत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत. काही रस्ते किनारट्टीला जोडणारे आहेत,त्यात कासाडे-विजयदुर्ग, नांदगाव – कसाल, मालवण – कुडाळ, कुडाळ – चीपी विमानतळ, सावंतवाडी- वेंगुर्ले आदी रस्ते महत्वाचे आहेत, ते रस्ते होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. पर्यटन वाढीसाठी आवश्यक रस्त्यांना तातडीने मंजुरी द्यावी, ही मागणी करणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले. जिल्ह्यात काही अधिकारी शुक्रवारी जातात, ते सोमवार सायंकाळी किंवा मंगळवार पर्यंत परत येत नाहीत. त्या अधिकाऱ्यांना सरकार बदल झाल्याची जाणीव नाही. जेणेकरून चांगले प्रशासन द्यायला हवे, त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. जनतेला चांगल्या प्रकारे न्याय मिळेल, अशी भूमिका आमची असेल असे राजन तेली यांनी सांगितले. भाजपा नेहमी युतीमध्ये असताना दूजाभाव केला जात असे, आता स्वतःचा पालकमंत्री येत आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आहे. त्यामुळे भाजपा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.शासकीय दौरा झाल्यावर रविंद्र चव्हाण पक्षाच्या कामाचा आढवा घेतील. तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या बैठका ते घेणार आहेत. लोकांनी पुल व रस्ते कामे मार्गी लावली जातील. नाबार्ड बजेट कामे जास्तीत जास्त निधी दिला जाईल.जिल्हा परिषद, २५ – १५ माध्यमातून तळागाळापर्यंत विकास केला जाईल. ठेकेदाराच्या हितापेक्षा जनतेच्या हिताचे काम केलं जाईल, असा विश्वास राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)