ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नेरूर वाघोसेवाडी प्राथमिक शाळा 'सभामंडप' उद्घाटन सोहळा..!!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नेरूर वाघोसेवाडी प्राथमिक शाळा 'सभामंडप' उद्घाटन सोहळा..!!

प्रकाशन: 05 Oct 2022 10:29 AM
वाचन संख्या 201

नेरूर । कुडाळ
देवेंद्र गावडे । उपसंपादक :

सोमवार दिनांक ३ ऑक्टो., २०२२ रोजी श्री गणेश विद्यालय, नेरूर-वाघोसेवाडी या जि.प. प्राथमिक शाळेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ‘सभामंडपा’चे उद्घाटन ‘सरस्वती पूजना’चे औचित्य साधून नेरूर गावचे प्रथम नागरीक तथा सरपंच धनंजय उर्फ शेखर गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रशालेची विविध सोयीसुविधांनीयुक्त इमारत असावी या हेतूने प्रेरीत होऊन सदर सभामंडपाची उभारणी करण्यात आली.

या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सौ. माया शृंगारे, शा. व्य. समिती अध्यक्षा सौ. ममता परब, वाघोसेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक प्रभाकर शृंगारे, पत्रकार दत्तराज शृंगारे, कंत्राटदार मयुर यादव, गौरव मोडक, निलेश मोडक, अंगणवाडी शिक्षिका सौ. सुप्रिया नेरूरकर, ग्रामसेवक कसालकर भाऊ आदि मान्यवर उपस्थित होते.

सर्वांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुंटे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार सौ. पूर्वा गावडे यांनी मानले.

सदर कार्यपूर्तीविषयी वाघोसेवाडी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे वनौशधीशास्त्र अभ्यासक व नेरूर-वाघोसेवाडीचे सुपूत्र रामचंद्र शृंगारे यांनी त्यांचीशी बातचीत करताना सांगीतले.

सदर कामाचा मुख्य भाग पूर्णत्वास गेला असला तरी अजूनही परीसरातली डागडूजी व सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. ही कामे लोकवर्गणीतून करण्यात येत आहे. तरी या कामांसाठी ज्यांना सढळ हस्ते मदत करायची आहे त्यांनी जरूर करावी. ज्यामूळे ही ग्रामीण दुर्गम.भागातील प्रशाला सुसज्ज स्वरूपात उभी राहील व इथल्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होईल, असे आवाहन रामचंद्र शृंगारे व वाघोसेवाडी वासियांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स