माजी नगराध्यक्ष संजू परब आयोजीत 'खेळ पैठणीचा' स्पर्धा उत्साहाने संपन्न..!
बांदा | राकेश परब :
मडुरा माऊली मंदिरात सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब आयोजित ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाच्या सौ. श्रावणी परब विजेत्या ठरल्या. सौ. रिदीमा परब उपविजेत्या तर सौ. अंजना सावळ तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. सावंतवाडी तालुका मराठा संघाच्या अध्यक्षा सौ. संजना परब यांच्या हस्ते श्रावणी परब यांना १५ हजार रुपयांची पैठणी देऊन गौरविण्यात आले. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मडुरा माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ६० हून अधिक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विविध पाच फेर्यांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली.
अंतिम फेरीत रिदीमा परब, सुवर्णा परब, प्रांजल जोशी, श्रावणी परब, नमिता मोरजकर, काजल परब, रेश्मा परब, अंजना सावळ, नंदिनी सावळ व रिना परब या दहा स्पर्धकात चुरशीची लढत झाली. यात श्रावणी परब या पैठणीच्या विजेत्या ठरल्या. द्वितीय रिदीमा परब व तृतीय अंजना सावळ यांना रोख पारितोषिके देण्यात आली.
यावेळी संजू परब, सौ. तेजश्री परब, नवरात्रोत्सव समिती अध्यक्ष दत्ताराम परब, सचिव संतोष परब आदींसह देवस्थान समिती पदाधिकारी, नवरात्रोत्सव समिती सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.मळेवाड सरपंच हेमंत मराठे यांच्या सुत्रसंचलनाने या कार्यक्रमात अधिकच रंगत आली. अभय परब, गणेश सातार्डेकर, नितीन नाईक व बाळू गावडे यांनी गुणलेखन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)