ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रोणापालमध्ये जिल्हास्तरीय भजन स्पर्धा संपन्न..!

रोणापालमध्ये जिल्हास्तरीय भजन स्पर्धा संपन्न..!

प्रकाशन: 04 Oct 2022 01:13 PM
वाचन संख्या 57

रोणापाल भजन स्पर्धेत स्वरधारा तांबुळी मंडळ प्रथम ; सत्यनारायण कळंगुटकर सर्वोत्कृष्ट गायक .

बांदा | राकेश परब :
रोणापाल येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा तांबुळी भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. दत्तगुरु भजन मंडळ वैभववाडी द्वितीय तर रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी संघाने तृतीय क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. रोणापाल येथील श्री देवी माऊली उत्सव मंडळाच्या वतीने माऊली मंदिर सभागृहात निमंत्रितांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन पं. स. माजी सभापती सौ. मानसी धुरी व मडुरा सोसायटी चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी माजी उपसभापती संदिप नेमळेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे, सरपंच सुरेश गावडे, बाबल तुयेकर, सावंत सर, सुदीन गावडे, तानाजी गावडे, यशवंत कुबल, उदय देऊलकर, दादा गावडे, पार्देश परब, शंकर गावडे, परीक्षक दिगंबर गाड, योगेश प्रभू, अमेय गावडे आदी उपस्थित होते.दोन दिवस झालेल्या भजन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबुळी, द्वितीय दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी, तृतीय श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, उत्तेजनार्थ श्री देवी माऊली भजन मंडळ साटेली. वैयक्तिक पारितोषिके – उत्कृष्ट हार्मोनियम वादक अजिंक्य कलंगुटकर (पाडलोस), पखवाज
तुषार नागडे (आंदूर्ले),तबला साईप्रसाद नाईक (पिंगुळी), कोरस दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी, गायक सत्यनारायण कलंगुटकर (साटेली), झांज रोशन गवस (पाडलोस), श्रोता बाप्पा निगुडकर (निगुडे).सर्व विजेत्या स्पर्धकांना अध्यक्ष प्रकाश गावडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, पुष्पगुच्छ व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण दिगंबर गाड (गोवा), योगेश प्रभू (कुडाळ) व अमेय गावडे (पाडलोस) यांनी केले. यावेळी तुषार देऊलकर, मंदार गावडे, प्रदिप नाईक, सागर गोठस्कर, नंदू नेमण आदींसह रोणापाल ग्रामस्थांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. स्पर्धेचे सुत्रसंचलन राजा सामंत यांनी तर आभार सुरेश गावडे यांनी मानले. दशक्रोशीतील शेकडो भजनप्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स