ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
उद्या दसर्याला मनसेच्या गरबा कार्यक्रमात मालवणवासिय थिरकणार ; बक्षिसांची रेलचेल..!

उद्या दसर्याला मनसेच्या गरबा कार्यक्रमात मालवणवासिय थिरकणार ; बक्षिसांची रेलचेल..!

प्रकाशन: 04 Oct 2022 01:39 PM
वाचन संख्या 176

धक्क्यावर आयोजीत भव्य गरबा कार्यक्रमला मनसे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मनविसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजनबद्ध आखणी ; ज्येष्ठ नागरीकांनाही आग्रहाचे निमंत्रण.

Article image

विशेष आकर्षण म्हणून सांघिक रास दांडिया गरबा नृत्य तसेच वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित .

मालवण | सुयोग पंडित : सध्या संपूर्ण मालवण शहर व तालुकावासियांमध्ये, ‘मनसे व मनविसे आयोजीत खुल्या स्तरावरील गरबा’ कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उद्या ५ ऑक्टोबर २०२२ दसऱ्या दिवशी तथा विजया दशमीदिवशी मालवण वासीयांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने कडून भव्य खुली गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मालवण वासीय लहान मुले ,तरुण-तरुणींना तसेच ज्येष्ठ नागरीकांनाही खुला गरबा खेळण्यासाठी केलेले आयोजन आहे.
यातील सहभागी व्यक्तींमधून उकृष्ट व्यक्तींना पुरुष,महिला व जेष्ठ आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ह्या स्पर्धे दरम्यान विशेष आकर्षण म्हणून सांघिक रास दांडिया गरबा नृत्य तसेच वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहे तरी मालवण वासीयांनी मोठ्या संख्येने ह्या भव्य गरब्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन मनसे व मनविसे कडून करण्यात आले आहे.

या अभूतपूर्व आयोजनासाठी गेले काही दिवस मनसैनिकांनी, पदाधिकार्यांनी व मनविसे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. या उत्तम सांस्कृतिक व सामाजिक मनोरंजन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे मालवण तालुका प्रमुख श्री. विनोद सांडव यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स